अहमदनगर। नगर सहयाद्री
संगमनेर तालुक्यातील समनापूर शिवारात शुक्रवार दि. २२ मार्चला रात्री पूर्वीच्या वादातून दोन मित्रांनी आपल्या मित्राला दारू पाजून त्याचा धारदार चाकूने गळा कापून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. अब्दुल उर्फ अतुल शोभाचंद सावंत (वय २३, रा. समनापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, समनापूर शिवारातील हॉटेल नेचर जवळील मोकळ्या मैदानात एका तरुणाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला.
आरोपींची माहिती मिळताच पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहल सारबंदे, धनंजय महाले, विशाल कर्पे यांनी किसन सरदार सावंत, सागर रमेश मुळेकर (वय २१) व राजेश मनोज मकवाणे (वय १९, दोघेही रा. समनापूर) आणि एकजण अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी मयताचा भाऊ सुनील शोभाचंद सावंत यांच्या फित्यादीवरुन वरील तीन आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.