स्लॅबचे प्लॅस्टर कोसळले | ठेकेदारावर तातडीने कारवाईची मागणी
अहमदनगर | नगर सह्याद्री
Ahmednagar News : नगर तालुयातील भातोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांच स्वागत करण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत झाल्यानंतर विद्यार्थी वर्गात जाऊन बसले आणि अचानक एका वर्ग खोलीतील सीलींग प्लॅस्टरचा काही भाग पडल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
प्रसंगावधान साधून ग्रामपंचायत सदस्य विक्रम गायकवाड आणि आदिनाथ शिंदे यांनी सिलिंगचे प्लॅस्टरचे पापुद्रे खाली पाडून विद्यार्थ्यांना धीर दिला. शनिवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा पहिला दिवस होता. इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत व पुस्तक वाटपाचा कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळे विद्यार्थी वर्गामध्ये बसत असताना एका वर्ग खोलीतील लावलेल्या सिलिंग प्लॅस्टरचे तुकडे खाली पडायला सुरुवात झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये धावपळ सुरू झाली.
तिथे उपस्थित असणारे नागरिकांनी वर्गामध्ये जाऊन ती सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर एका काठीने त्या सिलिंगला थोडासा धक्का दिला असता सिलिंगचे अनेक मोठमोठाले पापुद्रे खाली पडायला सुरुवात झाली. ग्रामपंचायत सदस्याने बाकावर चढून सिलिंगचे पापुद्रे खाली पाडले. सदर काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे सिद्ध झाले. कोणत्या ठेकेदाराने हे काम केले आहे? व कोणता इंजिनियरने या कामाची पाहनी केली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी गावकर्यांनी केली. विद्यार्थी बेंचवर बसले असते तर नक्कीच ते सिलिंगचे प्लॅस्टर विद्यार्थ्यांच्या डोयात पडले असते आणि विद्यार्थ्यांना दुखापत झाली असती हा मोठा अनर्थ टळला आहे. मात्र या ठेकेदारावर कारवाई केलीच पाहिजे अशी मागणी केली.
विद्यार्थ्यांच नशीब चांगलं विद्यार्थी वर्गात बसण्या अगोदरच सिलिंगचे प्लॅस्टर खाली पडल्याने गावकरी अवाक झाले. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या ठेकेदाराने केले आहे. या ठेकेदारावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी गावकरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करणार आहेत.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य विक्रम गायकवाड, शालेय समितीचे अध्यक्ष शरद पवार, आदिनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य कैलास गांगर्डे, विकास लबडे, दीपक कदम, बाबू पवार आदी उपस्थित होते. या सर्वांनी कारवाईची मागणी केली आहे.