नगर सह्याद्री / मुंबई
सीआयडी मालिका अत्यंत लोकप्रिय. या मालिकेतील फ्रेडरिक ची भूमिका वठवाऱ्या दिनेश फडणीस या अभिनेत्याचं निधन झाल आहे. ते ५७ वर्षांचे होते. रविवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची झुंज अपयशी ठरली.
अखेर सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. फडणीस यांच्या निधनाने सर्वच सहकलाकार दुखी झाले आहेत. अभिनेते दिनेश फडणीस यकृताच्या आजाराने त्रस्त होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हृदयविकाराचा झटका नव्हे, तर इतर आजारांचा त्याच्या यकृतावर परिणाम झाला होता. दोन दिवस ते व्हेंटिलेटरवर होते. काल रात्री 12 वाजता त्यांचा मृत्यू झाला. सीआयडीतील सर्व कलाकार सध्या दिनेशच्या कुटुंबाला आधार देत आहेत.
मालिकेतील सहकलाकार श्रद्धा मुसळे हिने दिनेशसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे व त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सीआयडीतील सहकलाकार दयानंद शेट्टी यांनी याबाबत माहिती दिली. दिनेश आता आपल्यात नाहीत. मध्यरात्री जवळपास १२ च्या सुमारास त्यांचं निधन झालं.
त्यांच्या पार्थिवावर आज दौलत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील असे ते म्हणाले. दिनेश फडणीस यांना CID मालिकेतून कमालीची लोकप्रियता मिळाली होती. फ्रेडिरिक्स हे विनोदी पात्र त्यांनी साकारलं. याशिवाय दिनेश यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्येही कॅमिओ केला होता.