spot_img
अहमदनगरAhmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

Ahmednagar Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात? तीन ठार; दोन गंभीर..

spot_img

Ahmednagar Accident News: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदाता लुक्यातील पारगाव रस्त्यावर एक ते दीड तासाच्या अंतराने दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दोन तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाला नगर येथे तर दुसऱ्याला दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात विकास दादासाहेब वाळके ( वय २२) गणेश छगन उर्फ छबु वाळके (वय २८ ) पिंटू उर्फ लक्ष्मण नारायण भेसर (वय ४२, तिघे रा. पारगाव) हे या अपघातात मयत झाले आहेत. अक्षय गायकवाड आणि आणखी एक तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की, काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पारगाव गावातील महादेव मंदिराजवळ सरस्वती नदी पुलावर पारगाव येथील वरील तीन मयत इसम दुचाकी वर जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात होऊन हे पुलावरून खाली पडले. त्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे एक जण जागीच ठार झाला तर दोघांचा रात्री श्रीगोंदा मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यानंतर या अपघातात जागीच ठार झालेल्या मताची डेडबॉडी श्रीगोंदा ला घेऊन येत असताना श्रीगोंदा पारगाव रस्त्यावर स्वामी विवेकानंद मेडिकल कॉलेज काही अंतर पुढे पारगाव च्या दिशेला डेडबॉडी घेऊन जाणारी रुग्णवाहिका आणि पारगाव च्या दिशेने जाणारी कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला यात रुग्णवाहिकेचा चालक अक्षय गायकवाड आणि मयत व्यक्तीचा पुतण्या हे दोघे गंभीर जखमी झाले.

अपघात एवढा भीषण होता की या आवाजाने आजूबाजूचे नागरिक तिथे जमा झाले त्या लोकांनी मोठ्या मेहनतीने रुग्णवाहिकेचा दरवाजा तोडून या जखमी तरुणांना बाहेर काढत तत्काळ श्रीगोंद्यात उपचारासाठी पाठवले दुसऱ्या कारमधील व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली असून तो कारचालक श्रीगोंदा महसूल मधील तलाठी असल्याचे समजते. पोलिसांना घटनेबाबत माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले अशा दोन अपघातात तीन तरुणांना आपला जीव गमावा लागला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले. श्रीगोंदा तालुक्यात या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...