मुंबई। नगर सहयाद्री
एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या कटूंबाला तोतया ईडी अधिकाऱ्याने फोन करत तब्बल १५ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. याप्रकरणी आमदार भोसले यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार शिवाजीराव भोसले यांच्यावर शिवाजीरावर भोसले सहकारी बँकेमध्ये ७० कोटी ७८ लाख रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत २५ फेब्रुवारी २०२० रोजी आमदार भोसले यांना अटक करण्यात आली होती.
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यातुन आमदार भोसले यांना सोडवण्याच्या नावाखाली तोतया ईडी अधिकाऱ्याने त्याच्या पत्नी रेश्मा भोसले यांना यांना फोन करत तब्बल १५ कोटी रुपयाची मागणी केली. याप्रकरणी पत्नी रेश्मा भोसले यांच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.