अहमदनगर / नगर सह्याद्री : महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अहमदनगर दौरा आहे. दौऱ्यांच्या अनुषंगाने अहमदनगर उपविभागातील झापवाडी शिवार, ता. नेवासा, जि.अहमदनगर येथील प्रमोद राधेशाम खंडेलवाल व इतर तिघांच्या शेतजमिनीत हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.
हेलिपॅड परिसर त्याचप्रमाणे शनिशिंगणापूर येथील शनैश्वर मंदीर व मंदीर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे उप विभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
या परिसरात कोणीही ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यासाठी वापर करणारे ड्रोन चालक, मालक, संस्था, आयोजक व नागरिक यांनी ड्रोन कॅमेरा किंवा तत्सम उपकरणाचा छायाचित्रीकरण करण्यासाठी दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजीचे 12 वाजेपर्यंत वापर करु नये. आदेशाचे उल्लंघन करणारा इसम भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 मध्ये नमुद केलेल्या शिक्षेस पात्र राहणार असल्याचे एका आदेशाद्वारे कळविण्यात आले आहे.