spot_img
ब्रेकिंगअहमदनगर ब्रेकिंग: मराठा समाज आक्रमक! 'त्या' महामार्गावर रस्तारोको; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

अहमदनगर ब्रेकिंग: मराठा समाज आक्रमक! ‘त्या’ महामार्गावर रस्तारोको; पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पुढच्या टप्प्यातील आंदोलनाला आता सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील गावागावातून गावबंदी, साखळी उपोषण सारखे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. नगर तालुयातील बुर्‍हाणनगर, शेंडी, पोखर्डी, कापूरवाडी, नागरदेवळे यांसह आसपासच्या गावांनी मिळून एकत्रितपणे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली बुर्‍हाणनगर फाटा येथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्तारोको केला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी रस्तारोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.

याप्रसंगी महामार्गावर वाहतूक कोंडी पहायला मिळाली. तर या आंदोलनाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरतीने करण्यात आली. यावेळी दत्ता तापकिरे, सरपंच रावसाहेब कर्डिले, उप सरपंच जालिंदर जाधव, रवी कर्डिले, मच्छिंद्र कर्डिले, रंभाजी कर्डिले, सागर भगत, सुशील तापकीरे, दीपक शिंदे, किरण पानसरे, नितीन शिंदे, अमोल धाडगे, मंगेश अनवणे, बंडू भगत, सुभाष जगताप, अली शेख, इसाख शेख, अवी तापकिरे, अण्णा कचरे, श्रीधर पानसरे, रंगनाथ कर्डिले, निवृत्ती कर्डिले, धर्मा जाधव आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार शांतता मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे त्यानुसार आज आम्ही बुर्‍हाणनगर फाटा येथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले आहे. सरकारने याची दखल घेऊन तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळून द्यावे, अन्यथा मराठा समाज ठरवेल ती दिशा हाती घेऊ, मराठा समाजातील युवा पिढीचे भविष्य उज्वल होण्यासाठी आरक्षण द्यावे जास्त वेळ न घालवता तातडीने निर्णय घेऊन मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण करावी असे अक्षय कर्डिले यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...