पारनेर / नगरसह्याद्री :
जादूटोणा करणाऱ्या महिलेने सांगितलेले उतारे टाकण्यास, सरबत पिण्यास नकार देणाऱ्या सुनेस मारहाण करत मानसिक त्रास देण्यात आला. याप्रकरणी पती, सासू, नणंदेसह देवऋषी महिलेच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
सासू सुवर्णा औटी, पती साईनाथ औटी, नणंद भाग्यश्री औटी व देवऋषी उषा कळमकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुभांगी साईनाथ औटी असे पीडित सुनेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी : शुभांगी औटी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझी सासू सुवर्णा विलास औटी यांचा दम्याचा आजार बरा व्हावा, नणंद भाग्यश्री विलास औटी हिचे लग्न जमावे, घरासाठी भाडेकरू मिळावेत यासाठी सासू, पती, नणंद जादूटोणा करणाऱ्या उषा कळमकर (घारगाव, कळमकरवाडी, श्रीगोंदे) या महिलेकडून गेल्या सात महिन्यांपासून अघोरी उपाय करून घेत आहेत.
या जादूटोणा करणाऱ्या महिलेने सांगितल्या प्रमाणे उतारे टाकण्यास, सरबत पिण्यास तसेच तुळजापूरच्या देवीचे वारे घेण्यास आपण नकार दिला.त्यामुळे आपणास सतत शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. आपण तरीही अघोरी कृत्य करण्यास तयार नसल्याने सासू, पती आणि नणंदेने मारहाण करत आपणास घराबाहेर काढले व माहेरी पाठवले.
११ आक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता पारनेर येथील राममंदीर परिसरात माझ्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र व तीन ग्रॅमची आंगठी हिसकावून घेतली. देवऋषी उषा कळमकर या महिलेच्या सांगण्यावरून आपली सासू, पती, नणंदेने आपणास मारहाण, शिवीगाळ केली तसेच मानसिक त्रास दिला असे फिर्यादीत म्हटले आहे.
नातलगांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
अंत्यविधीनंतर संतप्त जनसमुदायाने पारनेर पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. शितल व स्वराज यांना चिरडून पसार झालेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटना घडल्यानंतर लगेच गुन्हा का दाखल केला नाही अशी विचारणा करण्यात आली. तसेच अपघातग्रस्त वाहन पोलिस ठाण्यात कोणी आणले यासाठी पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीची मागणी जमावाने केली.