श्रीरामपूर । नगरसहयाद्री
हॉटेल चालकाचा डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नेवासा मार्गावरील बेलपिंपळगाव शिवारात काही दिवसापूर्वीच घडला होता. सदर गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
मंगळवार दि. १२ मार्च २०२४ रोजी श्रीरामपूर नेवासा मार्गावरील बेलपिंपळगाव शिवारात हॉटेल चालक बाळासाहेब सखाहरी तुवर यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाकामी सहा पथके मागील नऊ दिवस-रात्र तपास करत होते. अखेर खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांनी यश आले.
सीसीटीव्ही फुटेज मधून उलघडा!
घटनास्थळापासून साधारण ३०० मीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. घटनेच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीची हालचाल पोलिसांना त्यात दिसून आली. पोलिसांनी मागील नऊ दिवस त्यावरच तपास केला. सदर गुन्द्वातील अज्ञात आरोपी काही व्यक्तींना नक्की माहिती असणार, हे तपासी अधिकारी धनंजय जाधव जाणून होते.
पोलिसांनी केले नागरिकांना आवाहन
पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पोस्टातून ५० पैशाचे १०० कार्ड विकत घेतले. त्या कार्डावर स्वतःचे नाव आणि पत्ता स्वतःच लिहून सदरचे कार्ड कारवाडी आणि पाचेगाव शिवारामध्ये वाटप केले. आपल्याला आरोपी माहीत असल्यास या कार्डवर फक्त आरोपीचे नाव लिहून सदरचे कार्ड आपण कोणत्याही पोस्ट पेटीत टाकावे, असे आवाहन केले.
पोलिसांच्या आहवानाला नागरिकांचा प्रतिसाद
पोलिसांच्या आहवानाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन कार्डद्वारे सदरचा खून पोपट सुदाम सूर्यवंशी या व्यक्तीने वैयक्तिक भांडणातून केला असल्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी काल पोपट सुदाम सूर्यवंशी या व्यक्तीस शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता सुरुवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु खाक्या दाखविताच सदर खून केल्याबाबतची कबुली दिली.
किरकोळ कारणातुन वाद
काही दिवसांपूर्वी मयत हा चिकन घेऊन दुसऱ्या घरी बनवण्यास घेऊन जात असताना त्याची आरोपी बरोबर भेट झाली होती. त्यावेळी तू दुसन्याच्या घरी चिकन बनवायला का घेऊन जातो, बाबरून आरोपी आणि मयत यांच्यात बाद झाला होता. त्यावेळी मयताने आरोपीस मारहाण होती. याचा राग मनात धरून आरोपीने त्याचा काटा काढायचे ठरवले होते.