Ahmednagar news : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची निवड / उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी दिले नियुक्ती पत्र
शरद झावरे / पारनेर -जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व माजी सभापती प्रशांत गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड बुधवारी करण्यात आली आहे. यासंबंधीचे नियुक्तीचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही जबाबदारी माजी सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावर सोपवली असून गायकवाड समर्थकांनी जल्लोष केला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून काम करत असताना शेतकऱ्यांसाठी विविध योजना त्यांनी राबवल्या होत्या. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार मागणी करत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अनेक जाहीर कार्यक्रमात त्यांच्यावर कौतुकाची थाप टाकली होती.
पारनेर तालुका बाजार समितीचे माजी सभापती आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन जबाबदारी सोपवली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारनेर बाजार समिती तसेच सध्याचे जिल्हा बँकेचे संचालक पद यामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून मधल्या काळात अजित पवार अहमदनगर जिल्हा प्रशांत गायकवाड यांचे भर सभेत कौतुक केले होते. त्यामुळे लवकरच त्यांच्यावर अजून काहीतरी नवीन जबाबदारी पडेल असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये होता. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेले प्रशांत गायकवाड यांच्यावर पक्षाने चांगल्या जबाबदाऱ्या दिल्या असून प्रशांत गायकवाड यांनी त्या उत्तमरीत्या पार पाडल्या असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता त्यांना पुन्हा ही नवीन जबाबदारी दिली आहे. येणाऱ्या काळात निवडणूक असल्याने प्रशांत गायकवाड यांच्यासमोर आता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आणि निवडणुका यामुळे चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक प्रशांतराव सबाजी गायकवाड यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आमदार निलेश लंके, कृषी भुषण सबाजी गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.
जिल्हाध्यक्ष पदाच्या संधीचे सोने करणार : प्रशांत गायकवाड
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मला संधी दिली असून पक्ष संघटना वाढीसाठी यापुढील काळात मी प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढील काळात अहोरात्र प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदाची जी मला संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करणार असल्याची प्रतिक्रिया माजी सभापती प्रशांत गायकवाड यांनी दिली.