शिर्डी / नगर सह्याद्री : सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी आज सोमवारी शिर्डीत येत साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी थोडक्यात काही गोष्टींविषयी भाष्य केले. ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना राजकारण आणि मराठा आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला.
त्यावेळी वाडकर यांनी राजकारणाबद्दल मला काहीच माहीत नाही. मी गाणं वाजवणारा माणूस आहे, असे स्पष्ट केले. त्यांना मराठा आरक्षणावरुन राज्यात दुफळी माजत असल्याबद्दल विचारले. तेव्हा वाडकर यांनी म्हटले की, साईबाबांनीच मोदीजींना प्रधानमंत्रीपदी बसवलंय आहे. मोदींजी आता सर्वकाही व्यवस्थित करणार आहे. सर्व देवी देवतांनी आणि बाबांनी नरेंद्र मोदी यांची नेमणूक केलीय. ही नेमणूक फक्त चांगले करण्यासाठी केली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
सुरेश वाडकर भावुक
सुरेश वाडकर यांनी सहकुटुंब साई समाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानच्या वतीने वाडकर यांचा सत्कार करण्यात आला. खूप वर्षांनी येणं झाले आहे. ते आता आईची शिर्डीला येण्याची प्रखर इच्छा होती. त्यामुळे आलो आहे. 1967 पासून मी साईबाबांच्या दरबारी येतो. साई दर्शनानंतर मला फक्त रडायला येत आहे. बाबांकडे मी काहीच मागत नाही. बाबांनी काहीही न मागता सगळं देतात असं म्हटलं आहे.