अहमदनगर / नगर सह्याद्री : शहरातील झेंडीगेत परिसरातून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली.
नविद रफिक कुरेशी व अन्नू रफिक कुरेशी (दोन्ही रा.सुभेदार गल्ली,झेंडीगेट) हे दोन आरोपी कारवाईदरम्यान फरार झाले. पोलसांनी यावेळी तीन बैल, दोन गोर्हे व एका गाईची मुक्तता केली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
अधिक माहिती अशी : पोसई तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नविद रफिक कुरेशी व अन्नू रफिक कुरेशी यांनी कुरेशी मश्जिद मागे झेंडीगेट येथे गोवंशीय जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले आहेत. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांना घटनास्थळी मुद्देमाल व आरोपी आढळले. परंतु पोलिसांची चाहूल लागताच दोन्ही आरोपी पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता ६० हजार रुपये किमतीचे ३ बैल, एक गाय व २० हजार किमतीचे २ गोर्हे आढळून आले. पोलिसांनी त्यांची सुटका केली.