spot_img
ब्रेकिंगलाडक्या बहि‍णींना अजित पवारांचा शब्द.. म्हणाले ''मी कालच 6000 कोटींच्या फाईलवर सही...

लाडक्या बहि‍णींना अजित पवारांचा शब्द.. म्हणाले ”मी कालच 6000 कोटींच्या फाईलवर सही केली

spot_img

नाशिक । नगर सह्याद्री
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून राष्ट्रवादी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. या दौऱ्यात महिला व शेतकरी बांधवांना उद्देशून ते भाषण करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून अजित पवारांच्या यात्रेला सुरुवात झाली असून येथे हजारो महिलांनी त्यांचे स्वागत केले. राज्यात सध्या चर्चेत असलेल्या लाडक्या बहीण योजनेमुळे महिलांकडून अजित पवारांना धन्यवाद दिले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज अजित पवारांनी दिंडोरीतील भाषणातून लाडक्या बहिणींना शब्द दिला आहे. तुम्ही आमचं महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी आशीर्वाद द्या, पुढील 5 वर्षे ही योजना चालेल हा अजित दादाचा वादा आहे, असा शब्द अजित पवारांनी महिला भगिंनींना दिला आहे.

राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या राज्यात जोरदार चर्चेत आणि आकर्षित ठरली आहे. राज्यभरातून या योजनेसाठी तब्बल सव्वा कोटी महिला भगिनींनी अर्ज केले आहेत. राज्य सरकारकडून रक्षाबंधन सणाच्या अगोदरच महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे 3000 रुपये देण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा हफ्ता म्हणून 3000 रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिंडोरीतील भाषणातून याबाबत माहिती दिली.

माझी लाडकी बहीण ही योजना आम्ही तुमच्यासाठी दिली आहे. गावागावात, पाड्यावर, वाडीवस्तीवर सगळीकडं माहिती झालीय की, अशी योजना आलीय. गावाकडं आई स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन आपल्या लेकरांसाठी काहीतरी करते. पण, तिलाही वाटत असेल कुठतरी जत्रेत जावं, काहीतरी घ्यावं. महिलांच्या या आशा, अपेक्षांसाठी आम्ही यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणली. आया बहिणींनो, माय माऊलींनो, तुमचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही हा अजित दादांचा वादा आहे. माझ्या माय माऊलीच्या पाठीशी मी आहे. कालच, मी 6000 कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज तुम्हाला भेटायला आलोय, असे अजित पवार यांनी म्हटले.

माझी विनंती आहे, ते पैसे तुमच्या स्वत:साठी खर्च करा, वर्षभरासाठी 46000 कोटी रुपये आपण खर्च करत आहोत. विरोधकांकडून टीका केली जातेय की हा चुनावी जुमला आहे, पण माय माऊलींनो मी तुम्हाला सांगतो, हे तात्पुरतं नाही. तुम्ही महायुती सरकारला पुन्हा आशीर्वाद द्या. पुढील 5 वर्षे ही योजना चालेल हा अजित दादाचा वादा आहे, असे म्हणत पुढील 5 वर्षे ही योजना चालेल असा शब्दच अजित पवारांनी यात्रेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील महिलांना दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...