spot_img
महाराष्ट्रअजितदादांना पुन्हा धक्का बसणार! आणखी एक आमदार फुटणार?

अजितदादांना पुन्हा धक्का बसणार! आणखी एक आमदार फुटणार?

spot_img

पुणे। नगर सहयाद्री:-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. अजित पवारांसोबत अनेक आमदार महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. मात्र, शरद पवार यांनी आपल्यासोबत असलेल्या इतर आमदारांना घेऊन नव्याने पक्षाची उभारणी केली. त्यांनी तुतारी चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवून ८ खासदार निवडून आणले. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा परतीचे वेध लागले आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहरात अजित पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. दुराणी हे परभणीतील पाथरीचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी अचानक साथ सोडल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आता दुराणी यांच्या पाठोपाठ अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाच्या आमदार चेतन तुपे यांनी थेट शरद पवार यांच्या पुणे येथील कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. सातारा जिल्हा मित्र मंडळाच्या वतीने पुणे शहरात आयोजित गोल्डन ज्युबली कार्यक्रमात शरद पवार आणि चेतन तुपे एकाच व्यासपीठावर दिसले.

चेतन तुपे हे पुण्यातील हडपसरचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. मात्र, काही दिवसांपासून चेतन तुपे यांच्याकडून शरद पवार यांची मनधरणी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...