spot_img
अहमदनगरदारुच्या नशेत भान विसरला, समोर वहिनी दिसली आणि दिराने केले केलं काही..!...

दारुच्या नशेत भान विसरला, समोर वहिनी दिसली आणि दिराने केले केलं काही..! पोलिसही चक्रावले; वाचा नेमकं काय घडलं..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री:-
दिरानेदारूच्या नशेत टनक वस्तूने मारहाण करून भावजयीचा खून केल्याची खळबळ जनक घटना राहाता शहरात १५ चारी हद्दीत घडली. यात सविता लहानू पवार (वय ४०) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी राहाता पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी बबन गोविंद पवार याला पोलिसांनी जेरबंद केले आहे

राहाता शहरात १५ चारी हद्दीत प्रकाश जगताप यांचे पेरूच्या शेतात आदिवासी समाजाचे हे कुटुंब बाभळीची झाडे तोडून भट्टी लावून कोळसा बनविण्याचे काम करीत होते. पाथर्डी येथील ठेकेदार नारायण सोमा राठोड याने ल हे कामगार पुरवठादार आहेत. दरम्यान शुक्रवार आठवडे बाजार असल्याचे कारण देत बबन पवार व इतरांनी पगाराचे पैसे घेतले होते. शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत बबन गोविंद पवार याचे व मयत सविता लहानू पवार या दोघांमध्ये भांडण झाले.

भांडणामध्ये काहीतरी टनक वस्तूने डोक्यात कानशिलाजवळ मारहाण केल्याने मारहाणीत सविता हिचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी तिला उठवण्यासाठी आले असता सविता मृत असल्याचे त्यांना निदर्शनास आले. आरोपी फरार झालेला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर चक्रे फिरवत आरोपीला काही तासाच्या अटक केली.

सविताचा खून नेमका कोणत्या कारणाने केला. त्यामागचे इतर कारणे काय याचा उलगडा पोलीस तपासात समोर येईल. शेतमालक प्रकाश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी बबन गोविंद पवार यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे करीत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...