spot_img
अहमदनगरवाळूची गाडी सोडा म्हणताच ‘सुटली’! थेट वरिष्ठांसोबत करावी लागली सेटिंग

वाळूची गाडी सोडा म्हणताच ‘सुटली’! थेट वरिष्ठांसोबत करावी लागली सेटिंग

spot_img

महसूलमंत्र्यांसह जिल्हाधिकारी अंधारात | थेट वरिष्ठांसोबत करावी लागली सेटिंग
अहमदनगर | नगर सह्याद्री
अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठीची उपोषण सुटल्यानंतर त्याच अवैध धंद्याच्या विरोधातील कारवाईत जोरात सुरू झाली. मात्र, त्या कारवाईत स्वत:च्याच अत्यंत जवळच्या दोन कार्यकर्त्यांची वाळू वाहतूक करणारी दोन अवैध वाहने पकडली जाताच, ती वाहने सोडून द्या असं आर्जव करावी लागली. नेहमी स्थानिक पातळीवर फोनाफोनी करून मिटवून घेतले जायचे! मात्र, यावेळी थेट वरिष्ठ पोेलिस अधिकार्‍यालाच फोन लावण्याची नामुष्की संबंधितांवर आली. त्या अधिकार्‍यानेही खालच्या अधिकार्‍याला फोन करून ‘सोडून द्या’ असे फर्मान सोडले आणि पकडलेली दोन्ही वाहने वाळूसह सोडून देण्याची वेळ पारनेर पोलिसांवर आली. या घटनेची सध्या तालुक्यात आणि विशेषत: टाळकी ढोकेश्वर गटात जोरदार चर्चा आहे.

यबाबतची अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील अवैध धंदे आणि त्यांना पोलिसांकडून पाठराखण होत असल्याचा आरोप करत खा. लोकनेते नीलेश लंके यांनी मागील महिन्यात उपोषण केले. देशाचा अर्थसंकल्प मांडला जात असताना व त्या अनुषंगाने अधिवेशन चालू असतानाही खा. लंके यांनी जनतेच्या मनात पोलिसांबद्दल निर्माण झालेला असंतोष हेरला आणि अवैध धंद्यांच्या माध्यामतून पोलिसांचे हप्तेखोरीचे रेटकार्ड जाहीर केले. याशिवाय पोलिसांकडून जनतेला न्याय मिळत नसल्याची भावनाही व्यक्त केली. त्यांच्या आंदोलनास जिल्ह्यातील जनतेने दाद दिली आणि आपल्यासाठी लढणारा खासदार मिळाला अशी भावनाही जनतेमधून व्यक्त होऊ लागली.

राज्याच्या पोलिस महासंचालकांनी यात लक्ष घातले आणि त्यानंतर लेखी आश्वासन मिळाले. उपोषण सुटल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदे बंद होतील अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत होती. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीही अवैध धंदे बंद करण्याच्या अनुषंगाने निर्देश दिल्याच्या बातम्या आल्या. त्या बातम्यांच्या अनुषंगाने कारवाई सुरू असल्याच्या काही बातम्याही आल्या. मात्र, याच दरम्यानच्या कालावधीत पारनेर तालुक्यातील मुळा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडण्यात आली. पोलिसांनी वाहने पकडताच त्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने ती तहसील कार्यालयाकडे रवाना करण्याचे आदेश पथक प्रमुखाने दिले.

मात्र, ज्यांची वाहने पकडण्यात आली त्या सराईत वाळू तस्करांनी ही बाब त्यांच्या नेत्याच्या निदर्शनास आणून दिली. अवैध धंदे बंद करण्यासाठी उपोषण केले असताना आता तीच अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने सोडण्यास कसे सांगायचे असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, त्यावर लागलीच जालिम उपाय शोधला गेला आणि नगरच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याला फोनाफोनी झाली. यानंतर लागलीच संबंधीत पथकातील पोलिसांना ही दोन वाहने सोडून देण्याचे फर्मान निघाले. मात्र, त्याचवेळी या पथकाने अन्य तीन वाहनेही पकडली होती. ती तीन वाहने या पथकाने पोलिस ठाण्यात आणून लावली. तीन वाहनांवर कारवाई झाली असताना ती दोन वाहने कोणाच्या आदेशाने सोडली असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

अवैध धंदे बंदची मागणी मान्य झाली असताना पारनेरमध्ये धंदे जोरात कसे काय?
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची आणि त्याद्वारे सुमारे पाच कोटी रुपयांची हप्तेखोरी केली जात असल्याचा जाहीर आरोप खा. नीलेश लंके यांनी केला आणि तीन- चार दिवस उपोषण केले. त्या उपोषणाची दखल राज्याच्या पोलिस महासंचालकांनी घेतली आणि पंधरा दिवसात यावर कारवाईचे आश्वासन दिले. यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान पोलिस अधीक्षकांनी सोडल्याच्या बातम्या (पेरल्या) आल्या. मात्र, असे असतानाही पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक जोरदारपणे सुरू आहे. दिवसाढवळ्या पोलिस आणि महसूल यंत्रणेच्या नाकावर टिच्चून ही अवैध वाळू वाहतूक आणि मटका, जुगार यासह अवैध दारु विक्री असे धंदे चालू आहेत. खा. लंके यांनी उपोषण केले असल्याने हे धंदे नक्कीच त्यांच्या समर्थकांचे नसावेत अशी भावना आता तयार झाली आहे. तालुक्यात विखे यांचा दुसरा गट आहे. याचाच अर्थ हे अवैध धंदे विखे यांच्याच गटाचे असल्याची चर्चा असून त्यामुळेच महसूल- पोलिस प्रशासन कारवाई करत नसल्याची चर्चा झडू लागली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...