कर्जत / नगर सह्याद्री : पाच राज्यातील निवडणुका आता लवकरच उरकतील. त्यानंतर लगेच लोकसभेची तयारी सुरु होईल. यावेळी महाराष्ट्रात महायुती कोणत्या जागा लढवणार याबाबत चर्चा सुरु आहेत. त्यातच आता अजित पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे.
ते म्हणाले आहेत की, बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोत. सध्या या जागा आपल्याकडे आहेटच परंतु शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडे असणाऱ्या काही जागा आपण लढवणार आहोत असेही ते म्हणाले.
त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय होणार असून लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी महाराष्ट्रातील जागांवर चर्चा होईल असेही ते म्हणले. कर्जत येथे राष्ट्रवादीचे अधिवेशन सुरु असून याठिकाणी ते बोलतं होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, लोकसभेत निवडणूक झाल्यानंतर एनडीएचे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी आपल्याला काम करायचे असून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी माझ्यासह सर्वांना प्रयत्न करावे लागतील. आता आपल्याला बारामती, शिरुर, सातारा आणि रायगड या लढवणारच आहोत. पण त्यासोबतच इतर काही जागा ज्या उबाठा गटाकडं आहे जिथे राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे तिथेपण लढायचे आहे असे ते म्हणले.