संगमनेर । नगर सहयाद्री:-
युवक काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिलांना उद्योजकतेमध्ये प्रोत्साहन मिळावे याकरता विविध कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून सुगंधी धूप अगरबत्ती बनवण्याचे 250 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. असून एकविरा मुळे महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन मिळत असल्याचे ज्योती सस्कर यांनी म्हटले आहे
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात एकविरा फाउंडेशनच्या वतीने महिला उद्योजक कार्यशाळा संपन्न झाली यावेळेस मार्गदर्शिका ज्योती सस्कर, सुनीता कांदळकर, कविता पानसरे, रेखा फटांगरे, शितल उगलमुगले ,कमल आरगडे, अमृता राऊत ,दिपाली राहणे ,मनीषा शिंदे ,आदिसह महिला उपस्थित होत्या.
या कार्यशाळेत महिलांना अगरबत्ती, दिवे, सुगंधी धूप, मेणबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रशिक्षक ज्योती सस्कर म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात कायम महिलांचा सन्मान केला जात असून महिलांना उद्योजकता बनवण्यासाठी एकविरा फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात आहेत.
संगमनेर तालुक्यात सुमारे 2000 बचत गटातून त्या बचत गटातील महिलांना गृह उद्योगातून विविध वस्तू बनवणे व त्याची विक्री करणे यासाठी सुविधा निर्माण करून दिली जात आहे. याचबरोबर नव्याने महिलांनी उद्योजक व्हावे याकरता तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित केले जातात यामुळे अनेक महिलांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी 250 महिलांनी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत सुगंधी अगरबत्ती सुगंधी धूप मेणबत्ती विविध प्रकारचे दिवे बनवण्याचे प्रशिक्षण घेतले.