spot_img
अहमदनगरसावधान! महानगरपालिकेकडून दुकानदारांना होतोय दंड, तुम्ही ही 'ते' काम करत नाही ना?

सावधान! महानगरपालिकेकडून दुकानदारांना होतोय दंड, तुम्ही ही ‘ते’ काम करत नाही ना?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
प्लास्टिक संदर्भात महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे हॉटेल्स व दुकाने अशा पाच आस्थापनांना महापालिकेकडून २५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. शहरात सध्या केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मसफाई अपनाओ, बिमारी भगाओफ अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार मसफाई अपनाओ, बिमारी भगाओफ अभियानांतर्गत हरितकचरा उचलणे, प्लास्टिक बंदीची शंभर टक्के अंमलबजावणी करून प्लास्टिकचा कचरा कमी करणे, यासह आरोग्य विषयक उपाययोजना करण्यात येत आहेत. या अंतर्गत महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रोफेसर कॉलनी चौकातील दुकाने, हॉटेल्सची तपासणी केली.

यात प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या रुचिरा स्वीट्स, हॉट चिप्स, अक्किज बर्गर कॅफे, बॉम्बे ग्रिल कॅफे, जाधव वडेवाले या पाच आस्थापनांना प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे २५ हजार रुपये दंड करण्यात आला. तसेच १५ किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत स्वच्छता निरीक्षक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...

इंस्टाग्रामची चॅटींग ११ तोळ्यांला भोवली! मेकॅनिक रेहानने नेमकं काय केलं? अहमदनगर मधील घटना

अहमदनगर । नगर सहयाद्री:- सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब उजळणार? तुमची रास काय? वाचा..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा...