मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून ते गिरगाव येथिल रिलायन्स हरकिशन दास रुग्णालयात आहेत. त्यांच्या हृदयात ब्लॉकेज असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यांची अॅजियोग्राफी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोणत्याही क्षणी राज्यातील विधानसभा निवडणूकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणूकीच्या तयारीत व्यस्त आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानेही निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे प्रचारासाठी राज्यभर फिरणार आहेत, मात्र आता या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात दाखल केल्याने राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
हृदयातील हार्ट ब्लॉकेज तपासण्यासाठी उद्धव ठाकरे हे रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचं चेअकअप सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यापूर्वी, उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या हृदयातील ब्लॉकेज डॉक्टर तपासात असल्याची माहिती समोर आली आहे.