बीड / नगर सह्याद्री : मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी धडपडत आहेत. त्यासाठी त्यांनी केलेलं उपोषण लक्षणीय ठरले. सरकारच्या आश्वासनानंतर मात्र त्यांनी उपोषण थांबवले होते. आत आजपासून ते पुन्हा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यांचा हा दौरा नऊ दिवसांचा असणार आहे. ते मराठा समाजाच्या गाठी-भेटी घेऊन संवाद साधणार आहेत. परंतु आता या निमित्ताने मोठी बातमी आली आहे.
त्यांचा या दौऱ्यावेळी OBC समाजाकडून त्यांचा सत्कार होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांच्या धाराशिव जिल्ह्यातील वाशी त्यानंतर परांडा येथे सभा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या वाशी येथील सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यावर माळी समाजाच्या वतीने 100 जेसीबीतून फुलांची उधळण केली जाणार आहे. 1 टनाचा हार घातला जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा माळी समाजाकडून सन्मान हा ओबीसी नेत्यांसाठी धक्का आहे. त्याच कारण असं की,
नेते छगन भुजबळ यांच्यापासून अन्य ओबीसी नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आगपाखड करत आहेत. परंतु मनोज जरंगे पाटील म्हणाले होते की, गावा-गावातील ओबीसी समाजाचा पाठिंबा मला आहे, फक्त ओबीसी नेते विरोध करतायत. आणि आता या अनुशंघाने हे वक्तव्य खरं ठरत असल्याचं सांगण्यात येत आहे.
मराठा समाजात आनंद
कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला आरक्षण द्याव अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती. त्यानुसार, महाराष्ट्र सरकारने कुणबी नोंदींचा शोध घेऊन आरक्षण देण्यास सुरुवात केली आहे. कुणबी समाज ओबीसीमध्ये येतो. ओबीसी नेत्यांचा मराठा समाजाला अशा प्रकारे आरक्षण देण्यास विरोध आहे. दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांनी मोर्च, सभा आयोजित केल्या आहेत. परंतु आता obc समाजाकडून सत्कार ही अनेकांना चपकार असणार आहे.