श्रीरामपूर| नगर सहयाद्री
शहरातील डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे यांच्या बंगल्यावर काल पहाटे दरोडा पडला. तीन दरोडेखोरांनी चोरट्यांनी डॉ. ब्रम्हेना बांधले. जिवे मारण्याची धमकी देत कपाटाची चावी हस्तगत केली. ने त्यांच्या साक्षीने ४० लाख रुपयांची रोकड पळविली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर: श्रीरामपूर शहरात डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे यांचे हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटलच्या वरती राहतात. कटूंबातील सदस्य बाहेरगावी गेले असता ते आणि त्यांचा मुलगा चिन्मय दोघे घरी होते. चिन्मय हेही डोळ्याचे डॉक्टर आहे. पहाटे साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान तीन चोरट्यांनी लोखंडी शिडी डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या पुढच्या बाजूला लावली. वर चढताना अगोदर हॉस्पिटलच्या दरवाजालाही बाहेरून कडी लावली.
घराचा लॉक तोंडून घरात प्रवेश केला. अगोदर चोरट्यांनी डॉ. चिन्मय ब्रम्हे यांच्या रुम लॉक केला. आणि हे तिघे चोर डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे झोपलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी डॉ. प्रफुल्ल ब्रह्मे यांचे तोंड हाताने दाबले. दोन जणांनी लगेच त्यांचे हातपाय बांधले. नंतर चोरटे थेट ज्या कपाटात कॅश ठेवली, त्या कपाटाजवळ गेले. त्यांनी कटवणीच्या साह्याने ते उघडले. आणि कपाटातील कॅश एका बॅगेत. घेऊन तिघे चोरटे आल्या मार्गे पसार झाले.
मुलगा नेत्र रोग तज्ञ असल्याने त्यासाठी मशिनरी घ्यायच्या होत्या, त्यामुळे सदर कॅश ही घरात ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तीन चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम 392, 457, 458, 380, 342, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसी चोरीमुळे श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे.