spot_img
राजकारणब्रेकिंग : राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी, 'हे' १२ नवीन...

ब्रेकिंग : राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी, ‘हे’ १२ नवीन नियम लागू

spot_img

मुंबई / नगर सहयाद्री
येत्या ४ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभेच्या सदस्यांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. यात अनेक नवीन नियम करण्यात आले आहेत.

राज्यसभेच्या कोणत्याही सदस्याला ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम्’ हे शब्द उच्चारता येणार नाहीत. तसेच राज्यसभेचा खासदार ६० दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरहजर राहिल्यास त्याची जागा कायमची रिक्त राहील असा नवा नियम करण्यात आला आहे.

राज्यसभा कार्यालयाने ही नियमांची यादी जारी केली आहे. यामध्ये एकाच वेळी दोन सदस्यांना जागेवरून उठून प्रश्न विचारता येणार नाही. राज्यसभेत उपस्थित केले जाणारे प्रश्न सार्वजनिक केले जाणार नाहीत. तसेच, राज्यसभेच्या सभागृहात कोणत्याही प्रकारचे फलक झळकवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नवी नियमावली पुढीलप्रमाणे
1. राज्यसभेत उपस्थित केलेल्या मुद्द्यांची कोणतीही प्रसिद्धी करण्यात येऊ नये.
2. राज्यसभा सभापती नोटीस मंजूर करत नाही. इतर खासदारांना कळवत नाही तोपर्यंत ती नोटीस सार्वजनिक करू नये.
3. आत्तापर्यंत खासदार विशेषत: विरोधी पक्षाचे खासदार राज्यसभेत कोणताही महत्त्वाचा मुद्दा मांडण्यासाठी नोटीस देत असत पण आता असे होणार नाही.

4. सभागृहात धन्यवाद, आभार, जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणा देऊ नयेत.
5. सभापती यांनी दिलेल्या व्यवस्थेवर सभागृहाच्या आत किंवा बाहेर टीका करू नये.
6. सभागृहात फलक, पोस्टर, बॅनर्स आणायला आणि लावायला बंदी आहे.
7. सभापती यांना सदस्यांनी पाठ दाखवून बाहेर जाऊ नये.
8. सभापती बोलत असताना कोणत्याही सदस्याने सभागृह सोडू नये.

9. सभापती बोलत असताना सभागृहात शांतता असावी.
10. सभागृहात दोन सदस्य एकाचवेळी उभे राहू शकत नाहीत.
11. सदस्यांनी थेट सभापती यांच्याशी संपर्क साधू नये. ते सहाय्यक यांच्यामार्फत स्लिप पाठवू शकतात.
12. सदस्यांनी सभागृहात लिखित भाषण वाचू नये.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...