नगर सह्याद्री / पुणे
भावी शिक्षकांसाठी घेण्यात आलेली टीईटी परीक्षेत झालेला घोटाळा राज्यभर गाजला. याप्रकरणी मुख्य आरोपी आणि राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या विरोधात पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल होता.
त्यांना १७ डिसेंबर २०२१ रोजी अटकही झाली होती. दरम्यान त्यांच्याकडे सापडलेल्या तीन कोटी ५९ लाख ९९ हजार रुपयांच्या संपत्तीप्रकरणी कोणताही खुलासा करु शकले नव्हते. त्यांनी हे पैसे भ्रष्टाचारातून कमावले असल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडे ही रक्कम आली कुठून याची चौकशी सुरु असून राज्यातील आठ बडे अधिकारी चौकशीच्या रडारवर आलेत.
किती आहे रक्कम ?
तुकाराम सुपे यांच्याकडे एकूण ३ कोटी ५९ लाख ९९ हजारांची माया सापडली. त्यांच्या घरातून दोन कोटी ८७ लाख ९९ हजार रोख रक्कम मिळाली होती. तसेच १४५ तोळे सोन्याचे दागिने मिळाले होते. शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून लाच घेऊन त्यांचा पास केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या अधिकाऱ्यांकडेही घबाड
सोलापूर झेडपीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे उत्पनापेक्षा जवळपास सव्वापाच कोटी रुपयांची अपसंपदा जास्त मिळाली. सांगली येथील निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे यांच्याकडे ८३ लाख ९१ हजार ९५२ रुपये मिळाले.
या अधिकाऱ्यांची होणार चौकशी
विजयकुमार सोनवणे, अधीक्षक वेतन जिल्हा परिषद सांगली वर्ग दोन
वंदना वळवी, गटशिक्षणाधिकारी,महाबळेश्वर
प्रतिभा सुर्वे, गटशिक्षणाधिकारी,शाहूवाडी,कोल्हापूर
विलास भागवत, गटशिक्षणाधिकारी ,पाटण, सातारा
व्हीं, डी ढेपे, अधीक्षक शालेय पोषण आहार शिक्षण मंडळ पुणे
शिल्पा मेनन, अधीक्षक प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे
आर एस वालझडे, गटशिक्षणाधिकारी हवेली पुणे
प्रवीण अहिरे, विभागीय उपसंचालक