नवी दिल्ली । नगर सह्याद्री
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित 5 योजनांसाठी केंद्र सरकारने पेटारा उघडला आहे. या योजनांसाठी दोन लाख कोटींची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. या योजनांचा एकूण चार कोटीहून अधिक लोकांना फायदा होणार असल्याचंही सीतरामन यांनी स्पष्ट केलं.
केंद्रातील मोदी सरकारचा हा 13 वा अर्थसंकल्प आहे. तर निर्मला सीतारामन याचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात येत आहे. या योजनांतून 4.1 कोटी लोकांना रोजगार आणि कौशल्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत 5 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे, अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.
जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आहे. पण भारतीय इकनॉमी चमकत आहे. गरीब, महिला आणि अन्नदाता यांना आम्ही हा बजेट अर्पण करत आहोत. आमच्या सरकारच्या कामांवर लोकांचा विश्वास आहे. भारतात महागाईचा दर 4 टक्के आहे. लोकांनी आमच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. लोकांना आमच्या धोरणांवर विश्वास आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.