बीड / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे. विधेयक मंगळवारी सभागृहात समंत झाले. त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली.
सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील २४ फेब्रुवारीपासून मोठे आंदोलन सुरु करणार आहे. आता हे आंदोलन गावागावात असणार आहे. प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन होणार आहे.
त्यानंतर २९ फेब्रुवारीपासून मराठा समाजातील म्हतारे उपोषणास बसणार आहे. तसेच ३ मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळीची वेळी असणारे लग्न संध्याकाळी करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.