नगर सहयाद्री टीम-
अनेक जण आपले दात स्वच्छ दिसण्यासाठी बाजारातुन वेगवेगळ्या प्रकारच्या टूथ पेस्ट खेरदी करत असतात. पण या टूथ पेस्ट आणि ब्रश पासून दातासोबत घराती ल या वस्तूही स्वच्छ करता येता हे तुम्हाला माहित आहे का?
लेदर शुज
अनेकदा आपल्या महागड्या लेदर शुजला डाग पडत असतात. आपल्याला तेव्हा ते नकोशी होतात. जे खूप मेहनत घेऊनही स्वच्छ होत नाही. अशावेळी तुम्ही पडलेल्या डागावर टूथ पेस्ट लावून ब्रशच्या साह्याने घासुन स्वच्छ करू शकतात.
फोन कव्हर
इंटरनेटच्या जमान्यात महागड्या फोनची क्रेज वाढत चालली आहे. त्यातच महागड्या फोनला महागडे कव्हर असतात. अधिक वापर करून तुमच्या फोनचे कव्हर पिवळे पडले किंवा त्यावर डाग पडले असतील तर ते तुम्ही टूथ पेस्ट लावून ब्रशच्या साह्याने घासुन स्वच्छ करू शकतात.
काचेची भांडी
अनके जण आपले किचन चमकण्यासाठी काचेच्या भांड्याचा वापर करत असतात. परंतु काचेचा भांड्याचा वापर अधिक प्रमाणात होत नसलयामुळे नेहमी स्वच्छ करण्यासाठी त्रस्त होत असतात. भांड्यावर तुम्ही टूथ पेस्ट लावून ब्रशच्या साह्याने स्वच्छ धुतल्यास पुन्हा चमक अनु शकतात.