spot_img
अहमदनगरजुन्या महापालिकेत आयुक्तांची अचानक झाडाझडती; समोर आला 'या' विभागाचा सावळा गोंधळ...

जुन्या महापालिकेत आयुक्तांची अचानक झाडाझडती; समोर आला ‘या’ विभागाचा सावळा गोंधळ…

spot_img

अहमदनगर नगर सहयाद्री:-
महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी काल, शुक्रवारी सकाळी जुन्या महानगरपालिकेत अचानक भेट देऊन तपासणी केली. जन्म मृत्यू नोंदणी विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने त्यांनी या विभागात झाडाझडती घेतली. यात मोठा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला.

अनेक अर्ज प्रलंबित असल्याचे आढळून आल्याने आयुक्त यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना चांगलेच फैलावर घेतले. या विभागात कामकाजाचे कोणतेही नियोजन नसल्याने त्यांनी जाब विचारला. नागरिकांचे अर्ज तत्काळ मार्गी लावा, असे आदेश आयुक्त डांगे यांनी यावेळी दिले.

जुन्या महानगरपालिकेत जन्म, मृत्यू नोंदणी विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने आयुक्त डांगे यांनी शुक्रवारी अचानक या विभागात भेट दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. काही कर्मचारी जागेवर उपस्थित नव्हते.

काही नागरिक दाखल्यांच्या प्रतिक्षेत होते. आयुक्त डांगे यांनी नागरिकांशी संवाद साधून तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनाही त्यांनी खडेबोल सुनावले.

नागरिकांना वेळेत सुविधा देण्याच्यादृष्टीने नियोजन करा. अर्ज प्रलंबित ठेऊ नका. कामकाजात सुधारणा करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. कामकाजात सुधारणा न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...