वासुंदे येथे शेतपानंद रस्त्याचे भूमिपूजन
पारनेर / नगर सह्याद्री :
राजकारण करताना प्रत्येक नेत्याचा अजेंडा ठरलेला असतो, निवडणुकांमध्ये त्या अजेंड्यावर तो सामोरे जातो. मी राजकारण करत असताना माझा विकासाचा अजेंडा ठरलेला आहे त्या माध्यमातून तालुक्यात विकासात्मक राजकारण करत आहे तालुक्यात निव्वळ राजकारण न करता विकास कामांच्या बाबतीत स्पर्धा करा राजकारण करत असताना विकास कामा करणे हे मी माझे प्रथम कर्तव्य समजतो असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.
वासुंदे येथील वासुंदे ते चेमटेवस्ती रस्ता टाकळी ढोकेश्र्वर मार्गे शेत पाणंद रस्ताचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश पठारे, अरुण ठाणगे, सतिष पिंपरकर, भाऊसाहेब सैद, चेअरमन नारायण झावरे, दिलीप पाटोळे, लहानु झावरे, लक्ष्मण झावरे, बाळासाहेब शिंदे, स्वप्निल झावरे, विलास साठे, अमोल शिंदे, दत्तात्रय बर्वे, अंकुश बर्वे, विकास झावरे, राजेश साठे, निलेश भालके, अशोक चेमटे, कैलास चेमटे, माऊली चेमटे, तुषार चेमटे, शुभम चेमटे, आदित्य राऊत, योगेश चेमटे, दिपक चेमटे, विशाल चेमटे, अशोक चेमटे, काशिनाथ चेमटे, बाळासाहेब झावरे, तुकाराम चेमटे, भास्कर चेमटे, पोपट चेमटे, रामभाऊ चेमटे, अरुण चेमटे, विशाल चेमटे, निलेश भालके, सोपान राऊत, सोपान राऊत, सोमनाथ राऊत, अजिंक्य खिलारी, शंकर झावरे, गणेश झावरे, प्रसाद झावरे, महादू दाते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.