spot_img
अहमदनगरअहमदनगरमध्ये गोंधळ ! नारायण राणे यांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांनी फडकवले काळे झेंडे

अहमदनगरमध्ये गोंधळ ! नारायण राणे यांच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांनी फडकवले काळे झेंडे

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अहमदनगर शहराजवळ असताना मोठा गोंधळ उडाला. ते अकोळनेर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असताना त्यांच्या तफ्यासमोर मराठा आंदोलक आक्रमक झाले.

तेथे युवकांनी काळे झेंडे फडकवले. एक मराठा लाख मराठा च्या घोषणांनी युवकांनी काळे झेंडे फडकवत नारायण राणे यांचा निषेध केला. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल केलेल्या टिकेमुळे मराठा समाज संतप्त झालेला आहे.

त्यामुळे नारायण राणे येणार असल्यामुळे सकाळपासूनच त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी मराठा आंदोलकांनी तयारी केली होती. मात्र पोलिसांनी नारायण राणे यांच्या हेलिकॉप्टर उतरण्याआधीच काही युवकांना ताब्यात घेतले होते. मात्र काही युवकांनी नगर पुणे रोडवरील शिल्पा गार्डन समोर नारायण राणे यांचा ताफा अकोळनेर येथे जात असताना त्यांच्या तफ्यासामोर काळे झेंडे फडकून निषेध केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ‘या’ राशींसाठी व्यावसायिकांना आजचा दिवस…

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशिब फळफळेल...

Politics News:”मंत्री विखे पाटील यांच्या नियोजनामुळे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण”

Politics News: संगमनेर, निळवंडे कालव्यांचे पाणी आल्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पालक...

Ahmadnagar Politics:नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का! तालुकाप्रमुख ‘कमळ’ हाती घेणार?

Ahmadnagar Politics: नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसला आहे. जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) संजय काशिद...

साकळाई योजनेसाठी शेतकरी आक्रमक; कृती समितीचा पुढाऱ्यांवर हल्लाबोल, पाचपुते यांनीच केला घोळ…, शेलार, कार्ले, हराळ काय म्हणाले पहा…

'साकळाई'च्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य ओळखा कृती समितीचा खडकी येथे रास्तारोकोत इशारा | सिंचनभवनवर मोर्चा...