spot_img
ब्रेकिंगअखेर ठरलं! 'महाविकास' आघाडीचा फॉर्म्युला नेमका कसा? ठाकरे गटाला मिळणार 'ईतक्या' जागा

अखेर ठरलं! ‘महाविकास’ आघाडीचा फॉर्म्युला नेमका कसा? ठाकरे गटाला मिळणार ‘ईतक्या’ जागा

spot_img

Lok Sabha Election 2024: भाजपने राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला नसल्याने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आता समोर येत आहेत. तसेच महाविकास आघाडीचाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१-१३-४ असा महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे. यामध्ये भाजप ३१ जागा, शिवसेना शिंदे गट १३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ४ लोकसभेच्या जागा मिळतील, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचा देखील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने दोन फॉर्म्युले ठरवले आहेत. ज्यामध्ये वंचित महाविकास आघाडीसोबत आल्यास आणि सोबत न आल्यास असा विचार करुन हे फॉर्म्युले ठरवण्यात आले आहेत. वंचित महाविकास आघाडीसोबत आल्यास २०-१५-९-४ असा जागावाटपाचा फॉर्म्युला असेल.

ज्यामुळे शिवसेना ठाकरे गट २०, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ९ आणि वंचित ४ जागा असा फॉर्म्युला असणार आहे. तर वंचित महाविकास आघाडीसोबत न आल्यास २२-१६-१० असा फॉर्म्युला असेल. यामध्ये ठाकरे गटाला २२ जागा, काँग्रेसला १६ जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला १० जागा मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बारांपैकी आठ जागांवर दिसणार पवारांची ‘पॉवर’!

अकोलेत पिचड | साईबाबांच्या साक्षीने शिर्डीत विखेंना शह देणार आणि कोल्हेंना चुचकारणार | ढाकणे,...

MLA Sangram Jagtap: नगरकरांंनो फक्त दोन महिने..; आमदार जगताप नेमकं काय म्हणाले? वाचा

जुने आरटीओ ऑफिस रस्ता काँक्रिटीकरण कामाची पाहणी अहमदनगर | नगर सह्याद्री:- रस्ता काँक्रिटीकरणाचे कामे खोदून करावी...

‘साकळाई’ ला ‘ओव्हरफ्लो’ चं पाणी; कोण कोणाला वेड्यात काढतंय?

पिंपळगाव जोग्याचं पाणी पुणेकर चोरतात | पारनेकरांसाठी सोडलेल्या आवर्तनातून दिवसरात्र उपसा होतो जुन्नर तालुक्यात!...

Manoj Jarange Patil: ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, सरकारला काय दिला इशारा? वाचा सविस्तर

Manoj Jarange Patil: आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी...