सचिन वराळ पाटील यांची माहिती
निघोज। नगर सहयाद्री-
निघोज – अळकुटी जिल्हा परिषद गटातील २२ गावांमध्ये राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सव्वा दोन कोटी रुपयांची विकासकामे दिली असून गेली पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे देउन विखे पाटील यांनी निघोज – अळकुटी जिल्हा परिषद गटाला झुकते माप देण्याचे काम केले असल्याची माहिती संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष तथा निघोज – अळकुटी जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा सचिन वराळ पाटील यांनी दिली आहे.
अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की निघोज – गाडीलगाव रोड ते कैलास लंके मळा डांबरीकरण करणे ३० लाख, अळकुटी ते शेरीकासारे ते पोखरकर झाप रस्ता डांबरीकरण करणे ३० लक्ष रुपये, लोणीमावळा ते हनुमान वाडी रस्ता डांबरीकरण करणे ३० लाख रुपये, राळेगण थेरपाळ – माजमपूर स्मशानभूमी विकास करणे १० लाख रुपये, पाडळी आळे स्मशानभूमी विकास करणे १० लाख रुपये, कळस ग्रामपंचायत विस्तार करणे १० लाख रुपये, निघोज गाव अंतर्गत पेव्हींग ब्लॉक बसवीणे १० लाख रुपये, निघोज भुकनवस्ती मळगंगा मंदीर परिसर पेव्हींग ब्लॉक बसवीणे १० लाख रुपये, निघोज – पांढरकरवाडी रोड ते भास्करराव वराळ पाटील घर रस्ता डांबरीकरण करणे १० लाख रुपये, अळकुटी मेन पेठ रस्ता कॉंक्रटीकरण करणे १० लाख रुपये, अळकुटी एस टी बस स्थानक ते ग्रामपंचायत पेव्हींग ब्लॉक बसवीणे १० लाख रुपये, अळकुटी ग्रामपंचायत ते स्मशानभूमी रस्ता कॉंक्रटीकरण करणे १० लाख रुपये, राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत नवीन घंटागाडी चार लाख रुपये, वडनेर बुद्रुक ग्रामपंचायत नवीन घंटागाडी चार लाख रुपये, रेनवडी ग्रामपंचायत नवीन घंटागाडी चार लाख रुपये, म्हस्केवाडी ग्रामपंचायत नवीन घंटागाडी चार लाख रुपये, अळकुटी जिल्हा परिषद शाळा डिजिटल साहित्य साडे तीन लाख रुपये, निघोज जिल्हा परिषद शाळा डिजिटल साहित्य साडे तीन लाख रुपये, निघोज जिल्हा परिषद उर्दु शाळा डिजिटल साहित्य साडे तीन लाख रुपये, लोणीमावळा जिल्हा परिषद शाळा डिजिटल साहित्य साडे तीन लाख रुपये, म्हसे खुर्द शिंदे वस्ती जिल्हा परिषद शाळा डिजिटल साहित्य, निघोज काळे वस्ती जिल्हा परिषद शाळा डिजिटल साहित्य साडे तीन लाख रुपये अशाप्रकारे बावीस ठिकाणी सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच ही कामे मार्गी लागणार आहेत अशी माहिती वराळ पाटील यांनी दिली आहे. त्याबद्दल जनतेच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजय विखे पाटील यांना धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.