spot_img
अहमदनगरशरद पवारांवरील टीकेवर धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य.. म्हणाले

शरद पवारांवरील टीकेवर धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य.. म्हणाले

spot_img

पारनेर । नगर सह्याद्री
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार) आहेत. तुम्ही काय आरोप करत आहात? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. मी डंके की चोट पे सांगत आहे”, असा घणाघात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर केलाय. तसेच अमित शाह यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण गायब होतं, असा आरोप अमित शाह यांनी केला. अमित शाह यांच्या शरद पवारांवरील या टीकेवर राज्याचे कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “अमित शाह बोलल्यानंतर मी उत्तर देणं योग्य नाही. मात्र काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शाह बोलणार नाहीत”, असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

“विशाळगडाच्या प्रकरणानंतर शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणतंही वक्तव्य केलं नाही. उद्धव ठाकरे धारावी संदर्भात अनेक आरोप करतात. धारावी अडाणींच्या खिशात घालण्याचा प्रयत्न महायुती करतेय, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही मुख्यमंत्री असताना शेकलीन नावाच्या कंपनीला तुम्हीच काम दिलं होत. ते रद्द कुणाच्या काळात झालं आणि अडाणींना दिलं? याचा अभ्यास माध्यमांनी करावा. धरावीच्या पूर्वीच्या टेंडर प्रक्रियेबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं. तसेच आमचा उपयोग फक्त लोकसभेसाठी केला आणि वाऱ्यावर सोडलं हे आता मुस्लिम समाजच म्हणतोय”, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

“स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे माझे राजकीय गुरू आहेत. मात्र, माझे खरे गुरू उपमुख्यमंत्री अजित पवारच आहेत. अजित पवार यांनी मला अतिशय कठीण प्रसंगात राजकीय आधार दिला. गुरू आणि मोठे बंधू म्हणून अजित दादांनी मला इथपर्यंत पोहचवलं”, अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

“भाजपच्या स्वबळाच्या चर्चा फक्त माध्यमांमध्ये आहे. महायुतीतील कोणताही पक्ष स्वबळावर निवडणुक लढवणार नाही. आम्ही एकत्र लढणार यात तीळमात्र शंका नाही. भाजप त्यांच्या जागांसंदर्भात निर्णय घेईल”, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...