Vasubaras 2023: महाराष्ट्रामध्ये आज पासून वर्षांच्या मोठ्या सणाला सुरवात होत आहे. दिवाळीचा पहिला दिवशी वसूबारस म्हणजेच गाई वासरांची पुजा केली जाते. गोवत्स द्वादशी असाही वसूबारस हा सण ओळखला जातो. अश्विन कृष्ण द्वादशीच्या सायंकाळी गोपूजा करून दिवाळसणाला सुरूवात होते.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याकडे गायी, बैल, गुरं यांना मान दिला जातो. बैलांसाठी बैल पोळा तर गायीसाठी आपल्याकडे वसूबारस हे सण साजरे केले जातात. हिंदू पौराणिक कथांमध्ये, गायीला पवित्र आणि देवाचा अवतार मानले जाते. या दिवसाला वसूबारस किंवा गोवत्स द्वादशी असेही संबोधले जाते.
काय आहे महत्त्व?
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे,आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.