मुंबई। नगर सहयाद्री
दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत राज्यांतील काही भागात थंडीचे प्रमाण ही वाढली आहे.
महाराष्ट्रात आणि गोव्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. शनिवारी ही राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कोकण, गोवा, उत्तर कर्नाटकच्या काही भागात आज मुसळधार पाऊसाचा अंदाज आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, सह दक्षिण महाराष्ट्रात कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आजही हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.