नगर सह्याद्री टीम : तुम्ही जर शेअर बाजारातील गुंतवणूकदार असाल किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरवात करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. कारण आज दिवाळीच्या मुहूर्तावर थोड्याकाळासाठी शेअरमार्केट ओपन होते.
भारतात दिवाळीला लक्ष्मीमातेची पूजा केली जाते.
त्यामुळे शेअर बाजारातील लोकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच दिवाळीला तुम्हाला काही काळ शेअर्स खरेदी-विक्रीची संधी मिळते. जेणेकरून तुम्ही या शुभ दिवसाचा लाभ घेऊ शकाल आणि शेअर बाजारातून चांगले पैसे कमवू शकाल. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी ट्रेडिंग मुहूर्त मिळतो आणि या काळात तुम्ही शेअर बाजारात कोणतेही शेअर्स खरेदी आणि ट्रेड करू शकता. चला याठिकाणी आज किती वाजता शेअर्सबाजार खोलणार आहे व हा मुहूर्त कितीवेळ आहे ते जाणून घेऊयात –
दिवाळी मुहुर्तावरील ट्रेडिंग म्हणजे काय?
हा एक प्रकारचा शुभ मुहूर्त आहे, ज्याप्रमाणे आपण कोणतेही शुभ कार्य करतो तेव्हा त्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. तसाच दिवाळीच्या दिवशी शेअर मार्केट बंद असतो पण संध्याकाळी 1 तास मार्केट सुरु राहते. हाच असतो
दिवाळी मुहुर्त ट्रेडिंग. या 1 तासात तुम्ही शेअर बाजारातील शेअर्सची खरेदी/विक्री करू शकता.
जाणून घ्या आजचा शुभमुहूर्त
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगची वेळ संध्याकाळी 6.15 ते 7.15 पर्यंत आहे. यावेळेत शेअर बाजार सर्व गुंतवणूकदारांसाठी खुला असतो आणि या 1 तासाच्या कालावधीत आपण कोणताही शेअर खरेदी करू शकता आणि ट्रेडिंग देखील करू शकता. या दिवाळीच्या मुहूर्तावर गुंतवणूकदार काही शेअर्सची खरेदी नक्कीच करतात कारण दिवाळीच्या मुहूर्तावर असे करणे शुभ मानले जाते. या कालावधीत तुम्ही इक्विटी, इक्विटी फ्युचर्स अँड ऑप्शन्स, करन्सी आणि कमोडिटी मार्केट या तिन्ही फॉरमॅटमध्ये ट्रेड करू शकता.