नगर सहयाद्री टीम :आयुर्वेदाने आपल्याला चेहरा आणि त्वचेच्या आरोग्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगितलेले आहेत. त्यांचा वापर केल्यास चेहरा तजेलदार आणि डागविरहित होतो. चेहऱ्यावरील काळे डाग घालण्यासाठी काही घरगुती उपाय योजले पाहिजेत. जाणून घेऊयात त्याविषयी-
१) साखर: साखर ही चेहरा स्वच्छ धुण्यास उपयोगी पडते. त्यामुळे खूप इराक जेवतो.
२) ताक : टाकणे चेहरा धुवावा, ताकामुळे चेहर्याची तकाकी वाढते.
३) काकडीचा रस आणि गुलाब पाणी यांच्या मिश्रणातून तयार होणारा लेप दिवसातून दोन वेळा चेहर्यावर लावावे, नंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा. या मिश्रणात थोडा लिंबाचा रस सुद्धा मिसळावा.
४) लिंबाच्या रसाने चेहर्याची कातडी निरोगी होते. त्याचबरोबर काकडी आणि गुलाब पाण्याचा उपयोग चेहर्याच्या त्वचेला थंडाई पोचविण्यास कारणीभूत ठरतात.
५) मध आणि लिंबाचा रस: दोन चमचे मधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळून चेहर्यावरच्या गडद काळ्या डागांवर लावावा. काही मिनिटे हा थर चेहर्यावर ठेवावा आणि चेहरा थंड पाण्याने धुवावा. चेहरा तजेलदार होतो.
६) हळद: थोडीशी हळद घेऊन तिच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकावा आणि कच्चे दूध मिसळून त्यांची पेस्ट तयार करावी. हा थर चेहर्यावर वाळेपर्यंत ठेवावा आणि नंतर थंड पाण्याने धुवावा.
७) आपल्या शरीराचे घोटे, कोपरे आणि गुडघे अधिक काळे पडत असतात. त्यांना लिंबाचा रस चोळावा आणि पंधरा मिनिटानंतर ते भाग पाण्याने धुवून टाकावे. तिथली त्वचा सामान्य होते.