spot_img
अहमदनगरडॉ. सुजय विखेंचा थोरातांवर हल्लाबोल, काय म्हणाले पहा...

डॉ. सुजय विखेंचा थोरातांवर हल्लाबोल, काय म्हणाले पहा…

spot_img

शिर्डी | नगर सह्याद्री

मतदारसंघातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनीचा आणि संस्थानातील कंत्राटी कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अखेर माग लागल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान जे माजी महसूल मंत्री सात वर्षे पदावर होते, त्यांना गरिबांची आठवण का झाली नाही? त्यांनी या जनतेसाठी एक तरी काम केले आहे का? आता निवडणुका जवळ आल्या की हे नेते समाजात फिरताना दिसतात. परंतु, विखे पाटील परिवार नेहमीच लोकांच्या संपर्कात असतो आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतो असे सांगत डॉ. विखे यांनी आ. थोरात यांच्यावर हल्लाबोल केला.

सावळीविहिर बुद्रुक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ, मुख्यमंत्री वयोश्री योजना नोंदणी सोहळा, तसेच महीला बचत गटांना फूड प्रोसेसिंग युनिट वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी आणि लाभाथ उपस्थित होते. यावेळी डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिड मतदारसंघातील विकासाच्या संदर्भात बोलताना सांगितले की, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून खंडकरी शेतकऱ्यांचे जमिनींचे वगकरण आणि इतर तांत्रिक बाबी सोडवून, 250 कोटी रुपयांची बचत शेतकऱ्यांसाठी करण्यात आली आहे. सावळीविहीर येथे एमआयडीसी प्रकल्पात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला रोजगार मिळणार असल्याचे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. शेती महामंडळाच्या 500 एकर जागेत एमआयडीसी निर्माण होत असून त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. पुढील पाच वर्षांत मत मागायला येईल तेव्हा सावळी विहीर येथील प्रत्येक घरातील व्यक्तीला या प्रकल्पातून रोजगार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोमय्या औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित प्रश्न लवकरच माग लागणार आहे. या संदर्भात आराखडे तयार आहेत आणि लवकरच या वसाहतीतील समस्या सोडवल्या जातील. तसेच, या वसाहतीत महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील. एमआयडीसी व पशुवैद्यकीय दवाखान्यातील आवश्यक वस्तूंसाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कापडी पिशव्या आणि इतरया कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आश्वासनांवर समाधान व्यक्त केले. विकास कामे माग लागल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. साहित्य पुरवले जाईल, आशी ग्वाही त्यांनी दिली.

शिड मतदारसंघातील सर्वच प्रश्न नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवले जात असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी उभारलेले विविध प्रकल्प आणि योजना यामुळे या भागात प्रगतीची गंगा वाहत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सावेडीतील बहुचर्चित मॉडेल रोडची काळेंकडून पोल खोल; दीड वर्षात रस्ता गायब

चार कोटींवर डल्ला | दीड वर्षात रस्ता गायब अहमदनगर | नगर सह्याद्री सावेडी उपनगरातील बहुचर्चित मॉडेल...

धक्कादायक! महिलेची पावणे दोन कोटींची फसवणूक, असा घडला प्रकार…

अहमदनगर | नगर सह्याद्री केडगाव येथील महिलेच्या नावावर काही व्यावसायिकांनी अशोक सहकारी बँकेतून एक कोटी...

विखेंची कोंडी करताना थोरातांचीच होऊ नये म्हणजे बरं!

सारीपाट / शिवाजी शिर्के नगरच्या किल्ल्याचा किल्लेदार ठरवला जाणार | लोणीत तळ ठोकला असला तरी...

महायुतीची आघाडी! १०० उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब! केव्हा जाहीर होणार पहा..

मुंबई / नगर सह्याद्री - विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत १०...