spot_img
ब्रेकिंगहवामान विभागाने दिला दमदार पावसाचा इशारा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यामध्ये..

हवामान विभागाने दिला दमदार पावसाचा इशारा; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यामध्ये..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
|राज्यात हवामानातील सततच्या बदलांमुळे काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी उकडलेल्या उन्हाचा अनुभव घेतला जात आहे. हवामान विभागाच्या (IMD) ताज्या माहितीनुसार, आज राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. ला निनामुळं कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, त्यामुळं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते आणि सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो. देशातील जवळफास निम्मी शेतजमीन ही जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. हवामान विभागानं  दिलेल्या माहितीनुसार, ‘ला’ निनाच्या प्रभावामुळं यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पावसामुळं सोयाबीन, मका, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. तर जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. देशात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 7 टक्के पाऊस अधिक झाला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...