नगर सह्याद्री / अहमदनगर : सध्या इथेनॉल बंदीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्राने आदेश दिल्यानंतर कारखान्यातील इथेनॉल निर्मिती थाम्बली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी एफआरपी दर द्यावा लागेल, याने शेतकरी अडचणीत येतील असे म्हटले जात आहे.
परंतु आता खा. सुजय विखे पाटील यांनी असे काही होणार नसल्याचे म्हटले आहे. देशातील साखर कारखान्यातील इथेनॉल निर्मिती बंदीचा ऊस दरावर कोणताच परिणाम होणार नाही. उलट केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीनूसार शेतकर्यांना दर द्यावे लागतील. इथेनॉल बंदीचा विषय थेट शेतकर्यांशी निगडीत नाही यामुळे त्याचा काहीही परिणाम होणार नाही असे खा. विखे म्हणाले आहेत.
नगरमध्ये ते माध्यमाशी बोलताना त्यांनी अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, अनेक लोकांना भास व गैरसमज होत आहेत. ते दिवसा स्वप्न पाहात आहेत.
त्यामुळे त्यांनी एकदा मनपाने सुरू केलेल्या एमआरआय सेंटरमध्ये जाऊन मेंदू तपासून घेऊन ते फोटो घेऊन माझ्यासारख्या न्यूरोसर्जन डॉक्टरला दाखवावे व गैरसमज दूर करावा. वेळ पडल्यास मी त्यांचा इलाज करू शकतो व अजूनही वेळ गेलेली नाही असा सूचक तोलाच टोला खा. डॉ. विखे यांनी लगावला.