spot_img
अहमदनगरअहमदनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ? राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार) गटाच्या 'बड्या' नेत्याला भाजपाकडून...

अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ? राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार) गटाच्या ‘बड्या’ नेत्याला भाजपाकडून पक्ष प्रवेशाचे ‘निमंत्रण’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जामखेड तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी रोहित पवारांच्या हुकुमशाही कार्यपध्दतीला कंटाळून पक्षाचा राजानामा देण्याची घोषणा केली होती. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राळे भात हे कुठल्या पक्षात जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रा. मधुकर राळेभात यांनी भाजपात यावे, असे खुले निमंत्रण दिले आहे.

आहे. जामखेड तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. पक्षातूनन बाहेर पडताना प्रा. राळेभात यांनी आ. रोहित पवारांच्या हुकूमशाही कार्यपध्दतीवर सडकूनटीका केली होती. प्रा. मधुकर राळेभात हे जामखेड तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. त्यांच्याकडे मोठा जनाधार आहे. सर्वसामान्य जनतेत लोकप्रिय असलेल्या प्रा.. मधुकर राळेभात यांच्यासारखा ज्येष्ठ नेता आपल्या पक्षात असावा अशी सर्वच राजकीय पक्षांची पसंती असते. प्रा राळेभात यांनी भाजपात यावे यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांनी कंबर कसली आहे.

शिंदे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहित राळेभात यांनी भाजपात यावे, असे खुले निमंत्रण दिले आहे. राळेभात यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अनुभव खूप मोठा आहे. ते कायम सामाजिक कार्यात सक्रिय असतात. प्रा. मधुकर राळेभात यांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले.

त्याचबरोबर त्यांनी २००९ ची विधानसमा निवडणूक लढवत जामखेड तालुक्यात क्रमांक १ ची मते मिळवली होती.कर्जत-जामखेडच्या विकासासाठी आणि स्वाभिमानासाठी प्रा. मधुकर राळेभात हे भारतीय जनता पार्टीत आल्यास त्यांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल, अशी उघड भूमिका आमदार प्रा. राम शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मांडली आहे.

मधुकर राळेभात भाजपात जाणार का?
आ. प्रा. राम शिंदे यांनी राळेभात बांना भाजपात येण्यासाठी खुले निमंत्रण दिले आहे. तसेच राळेभात भाजपात आल्यास त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे आ. शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र, मधुकर राळेभात यांच्याकडून अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे ते भाजपात जाणार की इतर पर्याय निवडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...