spot_img
अहमदनगरराजकीय वर्तुळात खळबळ! काँग्रेसचे आमदार शिंदे गटात जाणार? 'या' दोन आमदारांनी घेतली...

राजकीय वर्तुळात खळबळ! काँग्रेसचे आमदार शिंदे गटात जाणार? ‘या’ दोन आमदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

spot_img

मुंबई ।नगर सहयाद्री:-
राज्यातील काँग्रेस पक्षाचे दोन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री (१३ ऑगस्ट) या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली.

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उभा केला नसता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण तिसर्‍या उमेदवारामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. महाविकास आघाडीची मते फुटल्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला झाला. अजित पवार गटाची मते फोडण्याची शरद पवार गटाची रणतीनी यशस्वी झाली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात ‘या’ धार्मिक स्थळी पिंड दान करा; पितरांना मिळतो मोक्ष आणि नाहीसा होतो पितृदोष

Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष मिळतो आणि पितृदोष दूर...

politics news: पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डीले सज्ज? राहुरीत कर्डिले विरुद्ध तनपुरेच!

अहमदनगर । नगर सहयाद्री :- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात...

ठरलं! उमेदवारांची पहिली यादी ‘या’ तारखेला जाहीर होणार? भाजप किती जागा लढवणार?, वाचा सविस्तर

मुंबई । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद...

२४ सप्टेंबरपासून पारनेरकर करणार आमरण उपोषण! नेमकी मागणी काय? वाचा सविस्तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- सरसकट कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्र शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली...