अहमदनगर । नगर सहयाद्री-
तू मला खूप आवडतेस, असं म्हणत सख्ख्या दिराने आपल्या वहिनीकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. धक्कादायक म्हणजे विवाहिता सासरी नांदत असताना दिराने तिच्यासोबत वेळोवेळी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. अहमदनगर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
मे 2024 पासून फिर्यादी विवाहिता सासरी नांदत असताना तिच्या भायाने ‘मला तु खुप चांगली दिसतेस, तु मला आवडते, तु माझ्याशी बोल’ असे म्हणून वेळोवेळी गैरवर्तन केले. फिर्यादीसोबत अश्लिल चाळे करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, माझ्याशी संबंध ठेवले नाही तर तुला संसार करू देणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकणी बुधवारी (24 जुलै) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दिराविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.