spot_img
अहमदनगरखळबळजनक! मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल; अखेर ते प्रकरण 'भोवल'

खळबळजनक! मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल; अखेर ते प्रकरण ‘भोवल’

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
सप्टेंबर २०२३ मध्ये गट क्रमांक़ २८ मौजे चेडे चांदगाव मधून अवैधरीत्या मुरूम नेल्याबाबत भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्यासह कंत्राटदार उदय मुंढे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.

मुरूम चोरून नेल्याबाबतची तक्रार चंद्रकांत सखाराम चेडे व नंदू उत्तमराव मुंढे यांनी शेवगावच्या तहसीलदारांकडे दाखल केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभाागचे उपअभियंता व चापडगाव मंडलाधिकारी यांना रीतसर पंचनामा करून अहवाल पाठविण्याचे निर्देशित केले होते. त्यानंतर पंचनामा करण्यात आला व त्यामध्ये अंदाजे ४०.६९ ब्रास मुरुमाचे अनधिकृत उत्खनन व चोरी केल्याचा अहवाल उपविभागीय अभियंत्यांनी शेवगावच्या तहसीलदारांना पाठविला.

या अहवालावरून तहसीलदारांनी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात यावा या आशयाचे पत्र याचिकाकर्ते चंद्रकांत चेडे यांना दिले. त्यावरुन चेडे यांनी शेवगाव पोलीस निरीक्षकांना मुरूम चोरीचा गुन्हा दाखल करून घेण्याबाबत तक्रार दाखल केली होती. परंतु संबंधि कंत्राटदाराच्या दबावाला बळी पडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही अथवा तक्रार दाखल झाली नाही. म्हणून याचिकाकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये फौजदारी याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर १४ ऑगस्ट २०२४ रोजी सुनावणी होऊन याचिकेकर्ते व सरकार पक्ष यांचा युक्तीवाद अंती मा. खंडपीठाने याचिकाकर्त्यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात खाजगी गुन्हा दाखल करण्याची परवानगी देण्यात आली.

तहसीलदाांनी या प्रकरणामध्ये आरोपी विरुध्द सबळ पुरावे असतांना देखील स्वताः गुन्हा का नोंदविला नाही म्हणून कठोर शब्दात निकालामध्ये ताशेरे ओढले आहे. संबंधित आरोपींनी यापूर्वी ग्रामपंचायत पिंगेवाडी येथे अशाच प्रकारे अवैध वाळूउपसा केल्याचे व त्या संदर्भात गुन्हा नंबर १०९५/२०२३ शेवगाव पोलिस ठाणे येथे नोंद असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास याचिकाकर्त्यांनी आणून दिले म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एम. सुब्रमण्यम व इतर विरुद्ध एस. जानकी व इतर यामध्ये जो न्यायनिवाडा दिला आहे, त्याप्रमाणे याचिकेकर्त्यांंनी सादर केलेले पुरावे मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल करून फौजदारी तक्रार दाखल करण्याची परवानगी दिली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...