spot_img
अहमदनगरसाकळाई योजनेसाठी शेतकरी आक्रमक; कृती समितीने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

साकळाई योजनेसाठी शेतकरी आक्रमक; कृती समितीने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री –
साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजनेसाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण करावा. योजनेसाठी लागणारे पाणी उपलब्ध प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साकळाई कृती समितीच्यावतीने रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी नगर दौंड महामार्गावर खडकी येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या ३० वर्षांपासून नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३० ते ३५ गावातील नागरिकांनी साकळाई पाणी योजनेसाठी लढा सुरु केला आहे. लाभधारक क्षेत्रातील ३५ गावांमधील नागरिकांनी योजनेसाठी वारंवार आंदोलन, उपोषण, मोर्चे, रास्तारोको, निवेदने देऊन सरकारता आठवण करुन देण्याचे काम केले आहे. परंतु, अद्यापही साकळाई योजनेता प्रश्न मार्गी लागलेता नाही. गत लोकसभा निवडणुकीच्यावेळी वाळकी येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना साकळाई योजना मार्गी लागण्याचा शब्द दिला होता. आताही राज्यात महायुतीचे सरकार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते यानी पाठपुरावा करुन सा- कळाईच्या सव्हेक्षणाचे आदेश काढले. तसेच सर्व्हेक्षणासाठी निधी टाकून कामही पूर्ण झाले आहे. आता योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. यासाठी कृती समितीचा पाठपुरावा सुरु आहे. साकळाई योजना पूर्ण करण्यासाठी शेतक-यांनीच आता आक्रमक भूमिका घेतली आहे. ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांनी

चिखली येथे रास्तारोको केला होता. आता पुन्हा २२ सप्टेंबर रोजी नगर दौंड महामार्गावर खडकी येथे रास्तारोकोचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या रास्तारोको आदोलनामध्ये शेतकन्यांनी हक्काच्या पाण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीचे अध्यक्ष हभप बाबा महाराज झेंडे, समाजसेवक भापकर गुरुजी, नारायण रोडे, संतोष लगड, सोमनाथ धाडगे, धामणे सर, शिवाजीराव विधाटे, रामदास झेंडे, रोहिदास उदमले, अमोल लंके, सोन्याबापू वाणी, राजेंद्र झेंडे, पुरुषोत्तम लगड, प्रतापराव नलगे आदींनी केले आहे.

शुक्रवारी सिंचन भवनला शेतकरी मांडणार ठाण
गेल्या अनेक दिवसांपासून साकळाई योजनेचा प्रश्न भीजत पडला आहे. परंतु योजनेचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे साकळाई कृती समिती शुक्रवारी सिंचन भवन येथे ठाण मांडून याबाबतचे निवेदन देणार असल्याची माहिती कृती समितीच्यावतीने देण्यात आली.

साकळाई योजनेसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री
साकळाई कृती समितीच्या पदाधिकान्यांनी बुधवार दि. १८ रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट योजनेबाबत सविस्तर चर्चा केली. पाणी उपलब्धतेबाबत कृती समितीच्यावतीने निवेदन देण्यात आले. साकळाई योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असून याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत कृती समितीची बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री यांनी यावेळी दिले. कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, ज्ञानदेव भोसले, संतोष लगड, प्रतिभाताई धस, बाळासाहेब नलगे, सुरेश काटे, नारायण रोडे, रोहिदास उदमले, डॉ. योगेंद्र खाकाळ, राजेंद्र झेंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...