अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:-
दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने तारले आहे. तर दुसरीकडे मका पिकावर पडलेल्या लष्करी अळीने मारले आहे. असे म्हणण्याची वेळ मका उत्पादक शेतकर्यांवर आली आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे मका उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
मृग व रोहिणी नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकर्यांनी खरिपातील बाजरी, मका, तूर, उडीद, सोयाबीन, कांदा, कपाशीची पेरणी व लागवड केली. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरीच्या चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन झाले. त्यामुळे खरीपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र मका पीक जोमात आलेले असून परंतु लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे कोमात गेलेले दिसून येत आहे. लष्करी अळीच्या हल्ल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
तालुयातील शेतकरी चार-पाच वर्षापासून आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. अवकाळी पाऊस गारपीट दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटामुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. कांद्याला बाजार भाव मिळाला नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले. कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यानंतर ही नव्या उमेदीने बळीराजा हंगामासाठी सज्ज झाला. हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकर्यांनी खरीपांचे नियोजन केले जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केली.
श्रीगोंदा तालुयात ८८८१.०० हेटर क्षेत्रावर मका पिकांची पेरणी झाली आहे. मका पीक कमी कालावधीत येणारी पिक आहे. तसेच मका हमखास पैसे देणारे पीक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मका पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असला तरी शेतकरी मका लागवडीकडे आकर्षित होत आहेत. मकावरील लष्करी अळीचे नियंत्रणासाठी शेतकरी अनेक महागड्या औषधांची फवारणी करीत पिक वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अगोदर शेती उत्पादित मालाला बाजार भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असतानाच मका पिकावर लष्कराळीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
चौकट
लष्करी आळीमुळे शेतकरी अडचणीत
मका पीक जोमात आलेले आहे. परंतु लष्करी आळीमुळे ते कोमात गेल्याचे दिसून येत आहे. खते, औषध व बियाणे महाग मोठ्या प्रमाणात महाग झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहे. मका काढणीनंतर मकाला भाव चांगला मिळाला तर ठीक आहे. नाही तर शेतकर्यांच्या नशिबी पश्चातापच होत असला तरी शेतकर्यांना शेती केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून अपेक्षांची ओझे उराशी बाळगून मका पिकाची पेरणी केली आहे. मका पिकवणे आमच्या हातात आहे. पण बाजार भाव आमच्या हातात नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी बाळासाहेब चव्हाण, मारुती भोसले यांनी बोलतांना मांडली.