श्रीगोंदा ।नगर सहयाद्री:
तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून सतत ढगाळ हवामानामुळे तसेच तालुक्यातील परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पण याच दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लाल कांदा व आणि उन्हाळ कांद्याची महागडी बियाणे खरेदी करून शेतात टाकली होती पण परतीचा सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांची रोपे उद्ध्वस्त झाली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे.
लागवड केलेल्या कांदा पिकावर मावा व करपा ने प्रचंड आक्रमण केल्याने लागवड केलेले कांदा पीक शेतातच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे लागवडीला आलेली लाल कांदा रोपे व कांदा पिके खराब झाली आहेत.
दुसरीकडे उन्हाळा लाल कांद्याची रोपे उध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी दुकानांमध्ये ही बियाण्यांचा तुटवडा दिसून येत आहे. यामुळे शेतकरी उन्हाळ कांद्याची रोपे कशी तयार करावी या संकटात शेतकरी सापडला आहे.
ढगाळ वातावरणामुळे नुकसान
यंदा गुलाबी कांद्याचे रोप व कांदा लागवड केली होती कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षांनी कांदा लागवड केली होती परंतु यंदा ढगाळ वातावरण आणि व परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे कांदा पिकाचे नुकसान झाले. लाल कांदा व उन्हाळी कांदा बियाणे खरेदी करून शेतात टाकली होती परंतु ढगाळ वातावरण व परतीच्या पावसाने जागेवर उध्वस्त झाल्याचे चित्र दिसत आहे असे प्रगतशील शेतकरी बाळू चव्हाण व मारुती भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.