Politics News: महाराष्ट्रात विधानसभेचा बिगुल वाजला आहे. सर्वच राजकीय नेते मंडळींनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर उद्या तीन दिवसात म्हणजेच 23 नोव्हेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची जोरदार तयारी सुरू आहे. नगर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १२ विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघात देखील इच्छुक उमेदवारांकडून जय्यत तयारी सुरु आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघात यंदाही महाविकास आघाडी कडून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनाच उमेदवारी दिली जाणार आहे. दरम्यान संगमनेर विधानसभा मतदारसंघातुन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील इच्छुक होते.
मात्र आता विजय विखे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांच्या माध्यमातून हाती आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाने एकाच घरात दोन उमेदवार देणार नसल्याची भुमिका घेतली आहे. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही.