spot_img
ब्रेकिंगगणेशोत्सव : 26 हजार गणेश मूर्ती परदेशात रवाना; यंदा 10 ते 20...

गणेशोत्सव : 26 हजार गणेश मूर्ती परदेशात रवाना; यंदा 10 ते 20 टक्के दर वाढ

spot_img

नगर सह्याद्री वेब टीम
पारंपारिक पद्धतीने नैसर्गिक रंग आणि केमिकलने मुक्त अशा पेणच्या गणेश मूर्ती परदेशात रवाना होत असतात. यंदा पेणमधून 26 हजार दणेश मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत.

यंदा गणेशोत्सवाचे आगमन सात सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे अतिशय थोडे दिवस या उत्सवाला राहीले आहेत. गणपती आणि त्याही पारंपारिक शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीसाठी पेण खूपच प्रसिद्द आहे. पेण येथील हमरापूरात गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना असून या कार्यशाळेत गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविण्याची लगबग सुरु झालेली आहे.

यंदा रायगड येथील पेण येथून पारंपारिक शाडूच्या मातीच्या गणेशमर्तींना खूपच मागणी आहे. पर्यावरणाविषयी जनजागृती वाढल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या समुद्रात सहजासहजी न विरघळणाऱ्या मूर्त्यांची मागणी दिवसेंदिवस घटत चालली आहे. यंदा पेणमधून 26 हजार गणेश मूर्ती परदेशात रवाना झालेल्या आहेत. यंदा सर्वच वस्तूंचे दर वाढल्याने गणेशमूर्तीच्या किंमतीत 10 ते 20 टक्के दर वाढ झाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...