पारनेर / नगर सह्याद्री : तालुक्यातील जवळा, सांगवी, सूर्या, निघोज, वडनेर, सिद्धेश्वरवाडी, पानोली यासह दहा ते बारा गावांत गारपीट झाली यामुळे झालेल्या नुकसानीची माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे पाटील यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांना दिली.
त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. रविवारी पारनेर तालुक्यात गारपीटीसह अवकाळी पावसाने घातलेले थैमान दुःखदायक व प्रलयकारी आहे. त्यामुळे महसूल मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती विश्वनाथ कोरडे व तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिली.
अस्मानी संकटाशी लढणार्या बळीराजाच्या मदतीसाठी सरकार तत्पर असून शेतकर्यांनी हवालदिल न होता खंबीररीत्या अनाहूत ओढवलेल्या अस्मानी संकटाला सामोरे जाणे गरजेचे आहे. माझ्यासह तालुयातील सर्वच भाजप पदाधिकारी शेतकर्यांसोबत असून महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कालच जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
बळीराजावर आकस्मिकरित्या कोसळलेल्या संकटामुळे तालुयातील कृषी व्यवसायाचे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकर्यांना मानसिक आधार देण्यासाठी कोरडे यांच्यासह शिंदे, जनसेवा फौन्डेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ, सुपा गावचे सरपंच दत्तानाना पवार, राळेगण थेरपाळचे सरपंच पंकज कारखिले व स्थानिक पदाधिकारी तालुयातील विविध भागांत नुकसानग्रस्त शेतकर्यांना भेटून आधार देत आहेत.
शेती अर्थव्यवस्थेचा कणा असून हे संकट फक्त बळीराजावरील नसून हे अखंड तालुयावर ओढवलेले संकट आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांसह राज्य व केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याचा आशावादही भाजप पदाधिकार्यांनी यावेळी व्यक्त केला.